चायवाला ते प्रदेशाध्यक्ष : अशोक सोनोनेंचा प्रवास...!

राज्यातील राजकारणात आता अशोक सोनोने हा एक नवा चेहरा उदयास येतो आहे. भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोनोने यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. चहा विक्रेता ते भारिप बहुजन महासंघ प्रदेशाध्यक्ष असा प्रवास करताना अशोक सोनाने यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे.
चायवाला ते प्रदेशाध्यक्ष : अशोक सोनोनेंचा प्रवास...!

खामगाव :  राज्यातील राजकारणात आता अशोक सोनोने हा एक नवा चेहरा उदयास येतो आहे. भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोनोने यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. चहा विक्रेता ते भारिप बहुजन महासंघ प्रदेशाध्यक्ष असा प्रवास करताना अशोक सोनाने यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे.

चहा आणि राजकारण हे समीकरण अनेकांना लागू पडते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पासून अनेक नेत्यांचे चहाचे किस्से माध्यमात गाजले आहेत. आता आणखी चहाशी नाळ जुळलेल्या एका नेत्याची ओळख महाराष्ट्रात होत आहे. त्या नेत्याचे नाव आहे अशोक सोनोने. अशोक सोनोने यांच्याशी 'चाय पे' चर्चा केली. त्यांना बोलते केले असता अनेक अनुभव त्यांनी कथन केले. 

त्यांच्या आई शांताबाई सोनोने सरकारी दवाखान्यात नोकरी करत असताना अशोक सोनोने विद्यार्थी दशेत चहा विकत होते. एकदा गावात एका ठिकाणी लग्न होते. अशोक सोनोने यांच्या आईनं त्यांना पाच रुपये दिले आणि 'आहेर करून पंगतीत जेवायला बस,' असे सांगितले. अशोक लग्नात गेल्यावर तुमची पंगत शेवटी असते, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे ते व्यथित झाले. तेव्हाच जातीव्यवस्थेविरोधात त्यांचा मनात चीड निर्माण झाली आणि ते जातीअंताच्या चळवळीचे सक्रीय कार्यकर्ते बनले. काही वर्षांत त्याना भारिप बहुजन महासंघात जिल्ह्याध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून जातीय सलोखा निर्माण केला. 

अशोक सोनोने यांच्या पुढाकाराने अनेक जातीय तंटे, वाद मिटले. पोलिस प्रशासनास त्याची मोठी मदत झाली. भारिपमध्ये ब्राम्हण, मराठा, माळी व अन्य जातींच्या लोकांना मानाची पदे सोनोने यांच्या पुढाकाराने मिळाली .रुग्णसेवा, समाजसेवा यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. अॅड. प्रकाश आंबेडकर यांना अभिप्रेत संघटन बांधनी अशोक सोनोने यांनी केली. त्यांच्यातील कार्यकर्ता प्रकाश आंबेडकर यांनी हेरला आणि थेट त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्तीनंतर अशोक सोनोने यांचा खामगाव मध्ये भव्य नागरी सत्कार झाला. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. भारिप बहुजन महासंघ आता राज्यात आपली पकड मजबूत करत आहे. भारिपच्या भूमिकेवर आगामी विधानसभा निवडणुकीचे समीकरण ठरणार आहे यासंदर्भात विचारले असता पक्षाची भूमिका अॅड. प्रकाश आंबेडकर हेच ठरवतील असे अशोक सोनोने म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com