अभिनेता अमिर खान ने केली हिवरेबाजाराची स्तुती

"पाणी आडवा, पाणी जिरवा... मोहीमेसाठी हिवरेबाजारच देशातील मार्गदर्शक प्रशिक्षण केंद्र आहे. पाणी फाउंडेशनच्या स्थापनेमागे याच गावाची प्रेरणा असून, आगामी काळात देशातील चार हजार गावे पाणीदार बनविणार असल्याचे प्रसिद्ध सिने अभिनेता अमिरखान याने येथे सांगितले.
अभिनेता अमिर खान ने केली हिवरेबाजाराची स्तुती

नगर : "पाणी आडवा, पाणी जिरवा... मोहीमेसाठी हिवरेबाजारच देशातील मार्गदर्शक प्रशिक्षण केंद्र आहे. पाणी फाउंडेशनच्या स्थापनेमागे याच गावाची प्रेरणा असून, आगामी काळात देशातील चार हजार गावे पाणीदार बनविणार असल्याचे प्रसिद्ध सिने अभिनेता अमिर खान याने येथे सांगितले. 

हिवरेबाजार (ता. नगर) येथील जलसंधारणाच्या कामांची पाहणी करण्यासाठी अभिनेता अमिर खान सपत्निक आला होता. राज्याच्या आदर्शगाव संपल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी त्याचे स्वागत केले. त्यानंतर अमिर खानने आपल्या पत्नीसह गावातील जलसंधारणाच्या कामांची सखोल माहिती घेऊन ग्रामस्थांनी संवाद साधला. हिवरे बाजारमध्ये पाणलोटासाठी झालेल्या कामांचीच प्रेरणा व प्रोत्साहन पाणी फाउंडेशनला मिळाले. त्यातूनच वाॅटर कपचा उपक्रम हाती घेतला असल्याचे अमिर खानने यावेळी आवर्जून सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com