marathi bhasha | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

राज्यपालांचे अभिभाषण गुजरातीत ऐकविल्याचा विरोधकांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

मुंबई : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे अभिभाषण मराठीऐवजी गुजरातीमध्ये ऐकविण्यात आल्याचा आरोप करत विरोधकांनी विधानसभेत फडणवीस सरकारला धारेवर धरले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. 

वास्तविक राज्यपालांचे अभिभाषण इंग्रजीत सुरू असताना ते मराठीत अनुवादीत करण्यात येऊन ते सभागृहातील सदस्यांना ऐकविण्यात येते मात्र आज महाराष्ट्राच्या इतिहासात आज ते चक्क गुजरातमध्ये ऐकविण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. 

पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत हा मराठी भाषेचा खून असल्याची टीका केली. गुजराती भाषेवरून सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी तर प्रचंड संताप व्यक्त करीत सरकारवर टीका केली. मराठी अनुवाद न झाल्यामुळे राज्यपालांचे भाषण मराठीत ऐकू आले नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करीत सभागृहाचे माफी मागितली. तरीही विरोधक शांत झाले नाहीत. विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला. 

संबंधित लेख