marathi bhasha | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उद्धव ठाकरेंनी उद्या 288 विधानसभा क्षेत्राच्या संपर्कप्रमुखांची बोलावली तातडीने बैठक
धनगर आरक्षणासाठी विधान भवनाच्या गेटवर यशवंत सेनेच आंदोलन

"मराठी'च्या अभिजात दर्जासाठी पाठपुरावा करणार : मुख्यमंत्री

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

सातारा : मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिली. 
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा परिषदेने दिला होता.

मात्र, जिल्हा प्रशासन व भाजपच्या प्रवक्‍त्या कांताताई नलावडे यांनी पाचगणीच्या हेलिपॅडवर मुख्यमंत्री व साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणली. या वेळी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, रवींद्र बेडकीहाळ, जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे आदींनी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. 

मुख्यमंत्री म्हणाले, ""न्यायालयातील प्रश्‍न निकाली निघाल्यामुळे यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत. पंतप्रधानाशी बोलून व्यक्तिशः याचा पाठपुरावा करेन. केंद्रीय मंत्रिमंडळात याबाबत लवकरच निर्णय होईल.'' 

मर्ढेकरांच्या भूमीत कवितेचे गाव 
कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांची जन्मभूमी असलेल्या सातारा तालुक्‍यातील मर्ढे या गावी भिलारप्रमाणेच कवितेचे गाव संकल्पना राबवावी, अशी मागणी या वेळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ""याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठवा. आपण याबाबत सकारात्मक कार्यवाही करू.'' 
 
संबंधित लेख