marathawada rajaya samaiti | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

स्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची स्थापना

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 जून 2017

औरंगाबाद : मराठवाड्यावर सर्वच क्षेत्रात अन्याय होत असल्याने स्वतंत्र मराठवाडा राज्य करावे यासाठी मराठवाडा विकास मंचतर्फे रविवारी (ता.11) बैठक घेण्यात आली. दरम्यान स्वतंत्र राज्य निर्मितीसाठी पायाभूत सुविधा, कृती आराखडा, उपोषणाची दिशा विषयावर मते मांडण्यात आली. यासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची स्थापना करण्यात आल्याचे मंचचे अध्यक्ष जे. के. जाधव यांनी सांगितले. 

मराठवाडावादी मंडळींनी विविध मुद्यांवर विचार मांडले. हौस म्हणून नाही, तर अन्याय झाल्यामुळे स्वतंत्र मराठवाडा करण्याच्या विचाराधीन असल्याचे मत द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांनी मांडले. बैठकीदरम्यान विभागीय कार्यालयासमोर आंदोलने, राज्यपालांची भेट, विधानसभा, लोकसभेत ठराव मंजूर घेणे, यासाठी गावोगावी स्वतंत्र मराठवाड्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी बैठका, ग्रामपंचायत, नगरपालिकेचा ठराव घेण्याविषयी चर्चा करण्यात आली.

तसेच मराठवाड्याच्या दौऱ्यास लवकरच सुरवात करणार असून जिल्हानिहाय बैठकीचे नियोजन तसेच 20 जूनला विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. बैठकीला चंद्रभान पारखे, जी. ए. नागरे, ऍड. के. ई. हरिदास, श्रीकांत उमरीकर, चंद्रकांत भराट, ओमप्रकाश वर्मा, बाबा उगले, व्ही. के. मठपती यांची उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री होणार द्वारकाभाऊ पाथ्रीकर 
बैठकीत तूर्तास मराठवाडा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून द्वारकाभाऊ पाथ्रीकर, अर्थमंत्री जे. के. जाधव यांच्या नावाची प्रा. संजय गायकवाड यांनी घोषणा केली. 17 सप्टेंबर ला क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथविधी होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

संबंधित लेख