maratha youth suicide | Sarkarnama

16 वर्षाच्या मराठा तरूणाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या 

नवनाथ इधाटे 
मंगळवार, 31 जुलै 2018

फुलंब्री : आयटीआय करण्याची मनामध्ये खुप इच्छा होती. पण केवळ मराठा असल्याने खुल्या प्रवर्गातून प्रदीपचा तिसऱ्या फेरीनंतरही नंबर लागला नाही. त्यामुळे निराश झालेल्या 17 वर्षीय प्रदीप म्हस्के या तरूणाने विहिरीत उडी घेत जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना फुलंब्री तालुक्‍यातील वडोदबाजार येथे घडली.

माझा मुलगा या व्यवस्थेचा बळी ठरला, अशा शब्दांत हरिदास म्हस्के यांनी आपल्या मुलाच्या बलिदानानंतर संतप्त भावना व्यक्त केल्या. 

सोमवारी (ता.30) औरंगाबादेत प्रमोद होरे पाटील यांनी रेल्वेखाली उडी मारून आरक्षणासाठी बलीदान दिले. त्यानंतर मंगळवारी (ता.31) वडोदबाजार (ता. फुलंबी, जि. औरंगाबाद) येथील प्रदीप म्हस्के या तरुणाने विहीरीत उडी मारून प्राण गमावले. 

मृतावस्थेत प्रदीपला विहीरीतून बाहेर काढल्यानंतर वडोदबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. पण तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना कळताच फुलंब्री परिसरातील सकल मराठा समाजाने वडोदबाजार येथे धाव घेतली. संतप्त झालेल्या समाजबांधवांनी औरंगाबाद-जळगाव मार्गावरील फर्शीफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध केला. 

आयटीआयचे स्वप्न अपुर्ण राहिले 

मुलाच्या मृत्यूनंतर दुखात बुडालेले वडील हरिदास म्हस्के म्हणाले, प्रदीपला आयटीआय करायचे होते. मात्र, तिसऱ्या फेरीनंतरही त्याचा नंबर लागला नाही. त्यामुळे तो निराश होता. आरक्षण मिळालेले असते तर प्रदीपला प्रवेशही मिळाला असता आणि तो आता आमच्यातही असता. या व्यवस्थेनेच माझ्या मुलाचा बळी घेतला आणि त्याचे आयटीआय करण्याचे स्वप्न अपुर्णच राहिल्याचे सांगतांना त्यांना अश्रू अनावर झाले. 

संबंधित लेख