maratha womens ultimetam in karad | Sarkarnama

राजाला प्रजेचं दु:ख कळावे म्हणून मराठा महिला वर्षा बंगल्यावर जाणार! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

कऱ्हाड (जि. सातारा) : मराठा आरक्षणासाठी आम्ही दोन वर्षांहुन अधिक काळ लढतोय. तरीही सरकार न्याय देत नाही. आता महिला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर जाऊन आंदोलन करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा मराठा समाजातील महिलांनी सरकारला दिला. 

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने बुधवारी कऱ्हाड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मराठा समाजाच्या महिलांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्यादरम्यान महिलांनी आरक्षणाबाबत मते व्यक्त केली. 

इंग्रजांच्या काळात जो त्रास झाला तो त्रास सध्या पोलिसांकडुन मराठा समाजातील मुलांना होत आहे. तो तातडीने बंद व्हावा. प्रत्येक गोष्टीत मराठ्यांचे खच्चीकऱण केले जात आहे. ते अयोग्य आहे. शेतीमालाल भाव नाही, आरक्षण नाही त्यामुळे शिकता येत नाही. ते आता सहन होईना झाले आहे. त्यामुळे राजाला प्रजेचे दु: ख कळत नसेल तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. आरक्षणासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन आंदोलन करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही महिलांनी दिला. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख