maratha samaj called off bandh in mumbai | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

मराठा समाजाने राजकीय पाठिंब्याशिवाय मुंबई बंद केली! हिंसाचारानंतर बंद स्थगित

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 25 जुलै 2018

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी  सकल मराठा समाजाने मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे पुकारलेला बंद दुपारी तीन वाजता स्थगित केला. राजकीय हेतूने हा बंद पेटविल्याचा आरोप मराठा समाजाच्या नेत्यांनी केला आहे. तसेच सरकारने मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलकांना हातात दगड घ्यावे लागले, असा दावा करण्यात आला. 

मोर्चेक-यांकडून शांतता राखण्याचं आवाहनही सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी केलं आहे. मुंबई बंदला मुंबईकर आणि व्यापा-यांनी दिलेल्या प्रतिसादाबाबतही समन्वयकांनी आभार मानले आहेत. शाळा, स्कूल बस, दुधाचे टँकर, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने यासारख्या अत्यावश्यक सेवांना त्यांनी या बंदमधून वगळलं होतं. तसंच कार्यकर्त्यांना शांततेने आंदोलन करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. 

काही लोकांना त्रास झाला असेल त्यांची आम्ही क्षमा मागतो, असं सकल मराठा समाजाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले.  दोन वर्षांपासून सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. औरंगाबादेत आमच्या बांधवाने आत्मदहन केल्यानंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्याची सल्लामसलत करून आम्ही बंदचा निर्णय घेतला होता. मुंबई बंद करायची असल्यास राजकीय पाठबळ लागत असल्याची भावना होती. परंतु राजकीय पाठिंब्याशिवाय आम्ही बंद यशस्वी करून दाखवला आहे, असा दावा त्यांनी केला. 

संबंधित लेख