maratha samaj agitation at Pawar`s residence in baramati | Sarkarnama

शरद पवार यांच्या बारामतीतील घऱासमोरही मराठा समाज गुरूवारी आंदोलन करणार

मिलिंद संगई
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

बारामती शहर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील "गोविंदबाग' या निवासस्थानासमोर गुरुवारी (ता. 9) सकाळी नऊ ते बारा या काळात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.

सकल मराठा समाजाच्या वतीने बारामतीत ठिय्या आंदोलन सुरू आहे. अनेक खासदार, आमदार यांच्या घरासमोर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आता शरद पवार यांच्याही घरासमोर आंदोलन करण्याच निर्णय संयोजकांनी घेतला आहे. या आधी शेतकरी संटनेनेने ऊस दरासाठी पवार यांच्या घरासमोर आंदोलन केले होते.

 येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास आज गावोगावच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला.  आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या समाज बांधवांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मेखळी येथील अप्पा महाराज सूर्यवंशी यांचे कीर्तन व कीर्तनकार शिवाजी शेळके यांचा भारुडाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या प्रसंगी तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.

 या ठिय्या आंदोलनमध्ये नीरा रस्त्यावरील माळेगाव, पणदरे, कोऱ्हाळे, वडगाव, वाघळवाडी, सोमेश्‍वर, लाटे, कांबळेश्‍वर, शारदानगर, धाकटे माळेगाव, होळ, मानापावस्ती, धुमाळवाडी आदी गावांतील मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतला. मंगळवारी (ता. 7) पाटस रस्ता व भिगवण रस्ता येथील समाज बांधव ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळावे, अशी समाजातील युवकांची तीव्र भावना असून, सरकारने लवकरात लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी युवकांनी केली आहे. 
 
संबंधित लेख