maratha reservation pankaja munde | Sarkarnama

#MarathaReservation मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, मी नाराज नाही : पंकजा मुंडे 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई : "" मी नाराज नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण द्यावे, अशी भूमिका राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या उपसमिती बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वाद झाल्याने पंकजा मुंडे या बैठकीतून निघून गेल्याचे वृत्त आहे, मात्र चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी त्यांची समजूतही घातल्याची माहिती आहे. 

अनेक कायदेशीर अडथळे पार करून मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात काही वेळात सादर केले जाईल. यापूर्वी गुरुवारी सकाळी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली. पंकजा मुंडे या उपसमितीच्या सदस्य नसतानाही त्या या बैठकीला हजर होत्या. शेवटी चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन या दोघांनी त्यांची समजूत काढली. हा वाद काही वेळ सुरु होता. त्यानंतर पंकजा मुंडे या बैठकीतून निघून गेल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. कुणबी समाजाला वगळून मराठा समाजाला जनसंख्येनुसार आरक्षण द्यावे, असा मुद्दा त्यांनी उपसमितीच्या बैठकीत मांडल्याचा दावाही केला गेला. 

यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की मंत्रिमंडळाच्या उपसमितीची सदस्य नाही. त्यामुळे त्या बैठकीला जाण्याचा प्रश्नच येत नाही. मी नाराज असल्याचे वृत्त खोटं आहे. मी नाराज नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची भूमिका आहे. पण त्यांना आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, हीच माझी भूमिका असल्याचे मुंडे यांनी सांगितले. 

संबंधित लेख