maratha-reservation-mumai-thane-raigad-palghar-band | Sarkarnama

मराठा आरक्षण : ठाण्यात बसची तोडफोड, टायर पेटवले

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

मराठा आरक्षणासाठी मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये आज पुकारण्यात आलेल्या `बंद'मध्ये सकाळी ठाण्यात बसची तोडफोड आणि रस्त्यावर टायर जाळण्याचे प्रकार घडले आहेत. अन्यत्र `बंद' शांततेत सुरू आहे. 

पुणे : मराठा आरक्षणासाठी मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये आज पुकारण्यात आलेल्या `बंद'मध्ये ठाण्यात बसची तोडफोड आणि रस्त्यावर टायर पेटवण्चाचे प्रकार घडले आहेत. अन्यत्र `बंद' शांततेत सुरू आहे. 

ठाण्यातील वागळे इस्टेट येथे आंदोलकांनी सकाळी टीएमटीच्या बसची तोडफोड केली आहे. ठाण्यातीलच माजिवाडा पुलावर आंदोलकांनी टायर पेटवून दिले आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक विस्कळित झाली आहे. आंदोलकांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत आजच्या मुंबई `बंद'चा निर्णय घेण्यात आला. 
ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ठाण्यातील वागळे इस्टेट येथे आंदोलकांनी सकाळी टीएमटीच्या बसची तोडफोड केली.

नालासोपारा भागात आंदोलकांनी वाहतूक रोखली. दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. पालघर शहरसह जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळत आहे. भोईसरमध्ये बंद सुरळित सुरू आहे.

 

संबंधित लेख