maratha reservation bill to be table on Wednesday | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठीचे विधेयक बुधवारी विधिमंडळात              

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा येत्या बुधवारी (२८ नोव्हेंबर) विधिमंडळात मांडण्यात येणार असल्याची शक्यता आहे.  

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या बुधवारी मागास आयोगाच्या शिफारसी सभागृहात मांडल्या जातील. मराठा समाजाची परिस्थिती असाधारण असल्याची शिफारस अहवालात केली असल्याने आरक्षणाचा मार्ग सोपा होईल, असे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे.

मराठा समाजाची लोकसंख्या ३२ टक्‍के असल्याने आरक्षणाचे प्रमाण १६ टक्‍के असेल असे मानले जाते आहे. मात्र मराठा समाजात कुणबी समाजाची समावेश करण्यात आल्याने हा आकडा अयोग्य असल्याचे सांगणारा मोठा वर्ग आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींना दुखावले जाणार नाही, अशी माहिती सरकारतर्फे वारंवार दिली जाते आहे. आरक्षणाचे प्रमाण वाढवुन देण्यात येणार असले तरी हा आकडा केवळ १० टक्‍के असेल असेही काही संबंधित नमूद करीत आहेत.

कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात १६ टक्‍के आरक्षण दिले असल्याने आता ते प्रमाण कमी करणे योग्य ठरणार नाही असे काही वरिष्ठ मंत्र्यांचे म्हणणे आहे. आकडेवारीची माहिती देणे टाळत मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी कर्नाटक आणि तमिळनाडूच्या धर्तीवर प्रचलित आरक्षणात कोणताही बदल नघडवता नवे प्रमाण दिले जाईल असे स्पष्ट केले. मराठा आरक्षणाला सर्व पक्षांनी पाठिंबा दयावा असे प्रयत्न सुरू आहेत.

मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारल्यानंतर हिवाळी अधिवेशनात तातडीने अहवाल सादर करण्याची मागणी विरोधकांकडून होत होती. त्यामुळे येत्या बुधवारी आणि गुरुवारी मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा करू असे सूचक विधान राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

संबंधित लेख