मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले जाणार - देवेंद्र फडणवीस

 मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले जाणार - देवेंद्र फडणवीस

पुणे : मागास वर्ग आयोगाने केलेल्या तिन्ही शिफारसी राज्य सरकारने स्वीकारल्या असून मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातील आरक्षण सरकार देईल त्यासाठी सरकारने मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली असून मराठा आरक्षणावर तोडगा काढला जाईल असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण राज्य सरकार देणार आहे असेही त्यांनी सांगितले. असाधारण परिस्थितीत असे आरक्षण देता येते, तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. एसई बीसी कॅटेगरीतून हे आरक्षण दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. 


आरक्षणाच्या अहवालावर व दुष्काळासंबंधी अधिवेशनात चर्चा होईल असे सांगून त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होईल. राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला आरक्षणासंबंधीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला असून यावर चर्चा होईल तसेच दुष्काळाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली जाईल असे त्यांनी सांगितले. केंद्रीय आयोगाच्या परवानगीची गरज नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

विरोधकांनी दुष्काळाचे केवळ राजकारण करू नये व शेतकऱ्यांना संभ्रमित करू नये असे आवाहनही त्यांनी केले. ठग्जच्या पोस्टरवरून विरोधकांनी केलेला पोरकटपणा थांबवावा असेही त्यांनी सांगितले. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते असला प्रकार करत आहेत असेही ते म्हणाले धनगर आरक्षणासंबंधीची शिफारसही केद्रसरकारडे पाठवली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com