maratha reservation | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार गजभिये विधानभवनात आले महाराजांच्या वेषात !

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

मुंबई : मराठा ,धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान करुन सरकारचे लक्ष वेधून आंदोलन केले. त्यांच्या आरक्षणाच्या या वेगळया आंदोलनाचीच आज विधानभवनात चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये हे नेहमी सरकारविरोधात वेगवेगळी आंदोलने करत असतात. याअगोदर त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये भीमा कोरेगाव दंगलीतील संशयित आरोपी संभाजी भिडे यांचा वेष परिधान करुन त्यांच्या मुले होणाऱ्या आंब्याची विक्री करत लक्ष वेधले होते.

मुंबई : मराठा ,धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान करुन सरकारचे लक्ष वेधून आंदोलन केले. त्यांच्या आरक्षणाच्या या वेगळया आंदोलनाचीच आज विधानभवनात चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये हे नेहमी सरकारविरोधात वेगवेगळी आंदोलने करत असतात. याअगोदर त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये भीमा कोरेगाव दंगलीतील संशयित आरोपी संभाजी भिडे यांचा वेष परिधान करुन त्यांच्या मुले होणाऱ्या आंब्याची विक्री करत लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यांनी संत तुकारामांचा वेष परिधान करुन आंदोलनामध्ये धार आणली होती आणि आता हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण आणि इतर विषयासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान करुन " देताय की जाताय' असं म्हणत सरकारचे लक्ष वेधले. 

मराठा धनगर मुस्लिम या समाजाला तात्काळ आरक्षण द्या, शिवाय जाहीर केलेली सरसकट कर्जमाफी कधी देणार आणि छत्रपती व बाबासाहेबांचे स्मारक कधी बांधणार असे प्रश्न उपस्थित करत आमदार प्रकाश गजभिये यांनी सरकारला ही आश्वासने पूर्ण करता येत नसतील किंवा देता येत नसतील तर 2019 मध्ये चालते व्हा असा इशाराही आमदार गजभिये यांनी दिला. 

संबंधित लेख