maratha reservation | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठीचे उपोषण  मागे, रणजित पाटलांची मध्यस्थी 

सुचिता रहाटे 
सोमवार, 5 जून 2017

मुंबई, ता. : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांशी आज गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज चर्चा केली. समाजाच्या मागण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे. समाजाला योग्य तो न्याय देण्यात येईल असे आश्‍वासन त्यांनी दिल्यानंतर मुंबईत सुरू असलेले उपोषण रविवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सल्लामसलत चर्चा करून मराठा आरक्षण मुद्यांवर शासन सर्व स्थरावर मागण्या पूर्ण करेल असे आश्वासन पाटील यांनी दिले. 

मराठा समाजाच्या मागण्यांमधील सारथी संशोधन व प्रशिक्षण संस्था जुलै महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल. मराठा समाजाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये वस्तीगृहासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा कामाला शासन प्राधान्य देईल, तसेच आगामी पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासंबंधी निवेदन करण्याचे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले. 

मराठा समाजाच्या विविध मागण्या व समस्यांबाबत शासन गंभीर असून त्या सोडविण्यासाठी शासन कटिबध्द राहील. अशी ग्वाही पाटील यांनी दिली. त्यानंतर उपोषकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.  

संबंधित लेख