maratha morcha, vikhe patil | Sarkarnama

मराठा आरक्षणाबाबत सरकारचे  तोडा-फोडा धोरण : विखेपाटील 

sarkarnama
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत फडणवीस सरकार दिशाभूल करीत आहे. गेल्या दोन अडीच वर्षापासून हे सरकार तोडा आणि फोडाचे राजकारण करीत आहेत असा आरोप विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना केला.

विखे पाटील यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढविला. ते म्हणाले, की राज्यात आतापर्यंत 57 मोर्चे काढण्यात आले होते. ते सर्व शांततेत पार पाडले आहेत. मात्र आजच्या मुंबईतील मोर्चाने समाजामध्ये उद्रेक निर्माण झाल्याचे चित्र आहे. हे सरकार मराठा आरक्षणाबाबत सभागृहात विषय मांडू दिला जात नाही. भाजप आणि शिवसेना सरकारने समाजाला आरक्षण देण्याचे दायित्व घ्यावे. आरक्षणाबाबत सरकारने खूप खोलात न जाता तातडीने याबाबत निर्णय घ्यायला हवा. मात्र सरकार समाजाला आरक्षण देण्याबाबत प्रामाणिक नाही. सरकारने जर आरक्षण दिेले पाहिजे मात्र तोडा आणि फोडाचे राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. 

संबंधित लेख