maratha morcha, mumbai | Sarkarnama

मुंबईत मराठा मोर्चाचा "फिव्हर' 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

मुंबई : जगभरात शांतता व शिस्तीचा पायंडा पाडणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचा "फिव्हर' मुंबईत जोर धरू लागला असून, आज राज्यातील विविध मुस्लिम संघठनांनी सक्रिय पाठिंबा जाहीर केला. बुधवार (ता.9) ला राजधानीत न भूतो असा ऐतिहासीक "मराठा क्रांती मोर्चा' होईल यासाठीची राज्यभरात तयारी पुर्ण झाली आहे. मुंबई वाहतुक पोलिसांनी देखील मोर्चा मार्ग, पार्किंग व वाहतुकीची यंत्रणा सुरळीत होईल यासाठी कंबर कसली आहे.
 
मोर्चात सहभागी होणारी वाहने व नागरिकांना मोर्चा मार्गाकडे जाणाऱ्या सूचना एमएम रेडिओ वरून सतत दिल्या जाणार असून, काही पोलिस व्हॅन देखील लाऊडस्पिकर वरून मार्गदर्शन करणार आहेत. 

मोर्चा आयोजकांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेवून मोर्चाच्या आयोजनाची माहिती सादर केली. देशातला सर्वात मोठा मोर्चा अशी या मोर्चाची गणणा होईल असा विश्‍वास आयोजकांनी व्यक्‍त केला. मराठा समाजाच्या मागण्या व समाजातील भावना सध्या संख्येने जमा होत मुक पणे मांडली जात आहे. राज्य सरकारने या निशब्द एल्गारची दखल घेवून मराठा समाजाच्या मागण्यांची तातडीने सोडवणूक करावी, अशी आयोजकांनी मागणी केली.
 
मुंबईतला मराठा क्रांती मोर्चा आतापर्यंतच्या सर्व मोर्चातील आचारसंहितेनुसारच होणार असून, मराठा स्वयंसेवकांची फळी त्यासाठी सज्ज झाली आहे. 
शिवाजी मराठा मंदिर येथील वॉर रूम मधून मोर्चाच्या आयोजनाबाबतची सर्वस्वी काळजी घेतली जात आहे. 

संबंधित लेख