Maratha Morcha Bhajan Agitation Nashik | Sarkarnama

मराठा क्रांती मोर्चाचे नाशिकला भजन आंदोलन 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 23 जुलै 2018

सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात अठ्ठावन्न मोर्चे निघाले. ते सर्व शांततेत झाले. मात्र, सरकारने त्याची काहीही दखल घेतली नाही, असे सांगत यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले.

नाशिक : परळी येथे सुरु असलेल्या धरणे आंदोलनाला पाठींब्यासाठी आज मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबई- आग्रा महामार्गावर पार्थडी फाटा येथे भजन आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सद्‌बुध्दी विठ्ठलाने राज्य शासनाला देवो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. 

सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात अठ्ठावन्न मोर्चे निघाले. ते सर्व शांततेत झाले. मात्र, सरकारने त्याची काहीही दखल घेतली नाही, असे सांगत यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात छत्रपती सेना, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा उद्योजक फोरम, जिजाऊ प्रतिष्ठाण, छावा मराठा महासंघ यांसह समाजाच्या विविध संघटना सहभागी झाल्या. चंद्रकांत बनकर, चेतन शेलार, निलेश शेलार, अस्मिता देशमाने, मगरसेवक दिलीप दातीर, राहुल जाधव, तुषार गवळी, विशाल पाटील, शैलेश कारले पाटील आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख