maratha morcha | Sarkarnama

"मराठा मोर्चात फूट पाडण्याऱ्यांना सोडणार नाही'

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

औरंगाबाद : मुंबईत 9 ऑगस्ट क्रांतीदिनी काढण्यात येणाऱ्या ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी परस्पर समिती गठीत करून मोर्चात विघ्न आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे मनसुबे आम्ही उधळून लावू असा इशारा देत समाज बांधवांनी औरंगाबादेत फुटीरांच्या पुतळ्याचे गुरुवारी पुंडलीकनगर येथे दहन केले. 

गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडे निवेदने सादर केली. मात्र, गर्दीचा उच्चांक मोडणाऱ्या मोर्चाची व मराठा समाजाच्या न्याय मागण्यांची दखल सरकारने घेतली नाही. या शासनाला जागे करण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिनी मुंबईत महामोर्चाची हाक देण्यात आली. या मोर्चाच्या तयारीसाठी समाज एकवटला असतांनाच त्यात फूट पाडण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोक करत आहेत. पण त्यांच्या भूलथापांना आता समाज बळी पडणार नाही. मोर्चा ठरल्याप्रमाणे निघणारच अशा निर्धार व्यक्त करत मोर्चा समन्वयकांनी फुटीरांच्या पुतळ्याचे दहन केले. मंगळवारी (ता. एक) शहरात काढण्यात आलेली जनजागरण रॅली ऐतिहासिक ठरली. 

यामुळेच सरकारने काही जणांना हाताशी धरून फुट पाडण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचा आरोप क्रांती मोर्चातील समन्यवयक करीत आहेत. त्यातच काही जणांनी पाठपुरावा तसेच मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करण्यासाठीची समिती गठीत केल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकाराने संतापलेल्या समन्वयकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच फुटीरांच्या पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी केली. 

संबंधित लेख