Maratha liable for politicla reservation : Narake | Sarkarnama

मराठे राजकीय आरक्षण मिळविण्यासही आता पात्र : हरी नरके

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पुणे : मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रवर्गात आरक्षण मिळाल्याने ते ओबीसी ठरले आहेत. त्यांना ओबीसी प्रवर्गातच प्रमाणपत्र मिळणार असल्याने ते राजकीय आरक्षण मिळण्यासही पात्र ठरले आहेत, असा दावा विचारवंत प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केला.

पुणे : मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रवर्गात आरक्षण मिळाल्याने ते ओबीसी ठरले आहेत. त्यांना ओबीसी प्रवर्गातच प्रमाणपत्र मिळणार असल्याने ते राजकीय आरक्षण मिळण्यासही पात्र ठरले आहेत, असा दावा विचारवंत प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केला.

मराठ्यांचा समावेश केंद्र सरकारच्या ओबीसी यादीतही होऊ शकतो. त्यामुळे मूळ ओबीसींच्या हक्काला धोका पोचू शकतो. त्याची भीती ओबीसींना आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. `सारथी` चे संचालक डाॅ. सदानंद मोरे यांनी नरके यांचा दावा खोडून काढताना मराठ्यांनी राजकीय आरक्षणाची मागणी केली नाही आणि सरकारनेही ते दिलेले नाही. त्यामुळे या मुद्याचा आता विचार करण्याची गरज नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दूरचित्रवाहिन्यांवर झालेल्या चर्चेत हे मुद्दे मांडण्यात आले. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिल्याचा दावा योग्य नसल्याचे स्पष्टीकरण नरके यांनी केले. ते म्हणाले की देशात कुठेही केवळ शिक्षण आणि नोकरीसआठी आरक्षण नाही. एखाद्या वर्गाचा ओबीसीमध्ये समावेश झाला की त्याला आपोआप नोकरी, शिक्षण यासह राजकीय आरक्षणही मिळते. त्यामुळे उद्या कोणी मराठा त्याचे प्रमाणपत्र घेऊन गेला तर त्याला ओबीसी प्रवगार्तून निवडणूक लढविण्यास कोणी रोखू शकत नाही.

मराठ्यांचा समावेश केंद्राच्या यादीत झाल्यास ते ओबीसींच्या सध्याच्या यादीतच दाखल होतील. तेथे ओबीसींना २७ टक्के आरक्षणातच त्यांचा समावेश होईल. त्यामुळे तेथेही ते ओबीसींच्या जागांतूनच आरक्षण मिळवतील, असे नरके यांनी सांगितले.  

   

संबंधित लेख