मराठा क्रांतीच्या मोर्चाची रणरागिणी रसिका शिंदेला शंभर टक्के गुण 

गेले वर्षेभर राज्यात मराठा क्रांती मोर्चे निघाले. त्यात सर्वात मोठा मोर्चा अशी चर्चा असलेल्या नाशिक तसेच मुंबईच्या मोर्चात पाच मुलींनी समाजाला हेलावणारी भाषणे केली. त्यातील एक मुलगी होती. रसिका शिंदे. तिने मुंबईच्या आझाद मैदानावर देखील भाषण केले होते. त्या भाषणाने ती राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली होती. विविध नेत्यांनी तीचे कौतुक केले. त्यामुळे ती चर्चेत होती. आता दहावीच्या परिक्षेत शंभर टक्के गुण मिळवल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे.
मराठा क्रांतीच्या मोर्चाची रणरागिणी रसिका शिंदेला शंभर टक्के गुण 

नाशिक : मुंबईत आझाद मैदानात आपल्या भाषणाने रसिका शिंदे या विद्यार्थीनीने मराठा क्रांती मोर्चा गाजविला. त्या रसिकाला नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परिक्षेत शंभर टक्के गुण मिळाले आहेत. महाराष्ट्र संघात क्रिकेट खेळणाऱ्या रसिकाने वर्षभर नियमित क्रिकेटची प्रॅक्‍टीस केली. त्यानंतरही तिने शंभर टक्के गुण मिळविल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.

गेले वर्षेभर राज्यात मराठा क्रांती मोर्चे निघाले. त्यात सर्वात मोठा मोर्चा अशी चर्चा असलेल्या नाशिक तसेच मुंबईच्या मोर्चात पाच मुलींनी समाजाला हेलावणारी भाषणे केली. त्यातील एक मुलगी होती. रसिका शिंदे. तिने मुंबईच्या आझाद मैदानावर देखील भाषण केले होते. त्या भाषणाने ती राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली होती. विविध नेत्यांनी तीचे कौतुक केले. त्यामुळे ती चर्चेत होती. आता दहावीच्या परिक्षेत शंभर टक्के गुण मिळवल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे. 

दहावीचा निकाल जाहीर झाला. अनेक विध्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले. येथील रसिका शिंदे हिने शंभर टक्के गुण मिळवले. आपले आणि कुटुंबाचे नाव उंचावले. विशेष म्हणजे ती राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू आहे. वर्षभर नियमित सराव करीत तिने हे यश संपादन केले. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या मराठा हायस्कूलची ती विद्यार्थीनी आहे. गेल्या वर्षभरात तिने महाराष्ट्र संघासाठी देशात अनेक ठिकाणी संघाला विजय प्राप्त करून दिला. वर्षभरात चार ते पाच महिने ती स्पर्धेसाठी बाहेर होती. अशा स्थितीतही तीने शंभर टक्के गुण मिळवले. तीचे आई मंगला आणि वडील प्रदीप दोघेही शिक्षक आहेत. 

या सगळ्या कठीण परिस्थितीत माझे आई, वडील आणि शिक्षक यांनी मला साथ दिल्यानं मला हे यश मिळवता आल. भविष्यात मला देशासाठी क्रिकेट खेळायचे आहे. भारतीय प्रशासन सेवेत (आय.ए.एस.) अधिकारी होण्याची इच्छा आहे. - रसिका शिंदे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com