maratha kranti morcha phalatan | Sarkarnama

मराठा आरक्षण : मुंडन करून फलटणमध्ये सरकारचे घातले श्राध्द

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

फलटण : मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच आरक्षण देण्यास असमर्थ ठरलेल्या भाजप शासनाच्या निषेधार्थ फलटणमध्ये आज 17 आंदोलनकर्त्यांनी मुंडन आंदोलन करत शासनाचे श्राध्द घातले. 

मराठा क्रांती मोर्चातंर्गत फलटणमध्ये मराठा समाजाचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास असमर्थ ठरलेल्या भाजप शासनाचा निषेध व्यक्त करून आंदोलनकर्त्यांनी आज मुंडन आंदोलन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध करत 17 आंदोलनकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेऊन सरकारचे श्राध्द घातले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख