परळीतले आंदोलन 30 नोव्हेंबरपर्यंत स्थगित

 परळीतले आंदोलन 30 नोव्हेंबरपर्यंत स्थगित

बीड : परळी येथे मागील एकवीस दिवसांपासून सुरु असलेले ठिय्या आंदोलन 30 नोव्हेंबरपर्यत स्थगित करण्यात आले आहे. न्यायालय आदेशाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. सात) दुपारी आंदोलक आणि प्रशासनात चर्चा झाली. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मेगा भरती थांबवावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी द्यावा यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी परळीत ता. 18 जुलै रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. यानंतर सुरु झालेले ठिय्या आंदोलन एकवीस दिवसांपासून सुरु आहे. 

दरम्यान, परळीतल्या आंदोलनामुळे राज्यात मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचे दुसरे पर्व सुरु झाले. आंदोलनाला हिंसक वळण आणि या मागणीसाठी समाजातील युवकांनी बलिदान देण्याच्या घटनाही घडल्या. परळीतले आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीत न्यायालयाने आंदोलनाबाबत व्यक्त केलेल्या मतावरुन मंगळवारी परळीतील आंदोलक आणि प्रशासनात चर्चा झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com