Maratha Kranti Morcha Nashik Scuffle with police | Sarkarnama

#MarahthaKrantiMorcha नाशिकला बंदला गालबोट, पोलिसांशी बाचाबाची, एटीएमची मोडतोड 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 25 जुलै 2018

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नाशिक शहरात बंदचे आवाहन करतांना ठिकठिकाणी त्याला हिंसक वळण मिळाले. एकलहरे येथे रस्त्यावर टायर जाळण्यात आले. नाशिक रोडला बसवर दगडफेकीसह एटीएम केंद्राची मोडतोड झाली. शहरात रविवार कारंजा येथे बंदचे आवाहन करतांना कार्यकर्त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला होता. 

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नाशिक शहरात बंदचे आवाहन करतांना ठिकठिकाणी त्याला हिंसक वळण मिळाले. एकलहरे येथे रस्त्यावर टायर जाळण्यात आले. नाशिक रोडला बसवर दगडफेकीसह एटीएम केंद्राची मोडतोड झाली. शहरात रविवार कारंजा येथे बंदचे आवाहन करतांना कार्यकर्त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला होता. 

सकाळी दहाला कार्यकर्ते बंदचे आवाहन करीत शहरात फेरी काढून घोषणा देत होते. यावेळी रविवार कारंजा भागात या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखत त्यांची कॉलर पकडुन धरपकड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही कार्यकर्ते पोलिसांनी समजावुन सांगत असतांना पोलिसांनी त्यांच्याशीही धक्काबुक्की केल्याने ही बाचाबाची वाढली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर कार्यकर्ते शहराच्या विविध भागात कार्यकर्ते बंदचे आवाहन करत होते त्याला प्रतिसाद मिळाला. 

नाशिक रोड रेल्वे स्थानकासमोरच असलेले बसस्थानक पुर्णतः बंद होते. त्यामुळे रेल्वेने नाशिकला येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाले. अनेक प्रवासी तेथे अडकुन पडले होते. सकाळी दहाला नाशिकरोडला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासुन मोर्चा काढण्यात आला. देवी चौक, रेल्वे स्थानक, सुभाष रोड, सत्कार पॉईंट, बिटको चौक, दत्त मंदीर चौक, मुक्तीधाम या भागातुन घोषणा देत हा मोर्चा निघाला. त्यात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले. निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड, नितीन खर्जुल, आर. डी. धोंगडे, गोरख खर्जुल, श्‍याम गोहाड, अशोक सातभाई, संतोष धारराव, शांताराम घंटे, साहेबराव खर्जुल आदी त्यात सहभागी झाली. या मोर्चादरम्यान बसवर दगडफेकीचा प्रयत्न झाला. एटीएम केंद्र तसेच एका कापड दुकानावरही दगडफेक झाल्याने बंदला गालबोट लागले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख