maratha kranti morcha latur | Sarkarnama

क्रांती दिनी राज्यभर कुटुंबासह मराठा क्रांती जनआंदोलनाचा लातूरमध्ये निर्णय

हरी तुगावकर
रविवार, 29 जुलै 2018

लातूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर वीस मागण्यासाठी गेली दोन वर्ष झाले राज्यभर आंदोलन सुरु आहेत. मोर्चे काढण्यात आली. ठोक मार्चे झाली. तरी देखील राज्य शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्याचा परिणाम उद्रेकात झाला आहे. आता चर्चेची दारे बंद झाली आहेत. शासनाने ठोस निर्णय घ्यावा या करीता क्रांती दिनी नऊ ऑगस्ट रोजी राज्यभर गुरंढोरं, कुटुंबासह गावा गावात मराठा क्रांती जनआंदोलन करण्याचा ठराव येथे रविवारी (ता.29 ) झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. 

या बैठकीत नऊ ठऱाव मंजूर करण्यात आले आहेत. या ठरावात ता. एक ते नऊ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात आमदार व खासदार यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करणे, गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनातील आंदोलकांवरील सर्व गुन्हे तात्काळ व बिनशर्त मागे घ्यावेत, मराठा क्रांती आंदोलनातील शहिदांच्या कुटुंबियांना 50 लाखाची आर्थिक मदत करावी, त्यांच्या कुटुंबियातील सदस्यास शासकीय नोकरीत घ्यावे, राज्य शासनास या पूर्वीच मागण्याचे निवेदन दिले आहे. त्यामुळे सरकारसोबत कसलीही चर्चा करायची नाही, तसेच कोणीही मध्यस्थी व चर्चेसाठी जाऊ नये, आंदोलनातील शहिद काकासाहेब शिंदे व तोडकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अधिकारयांची "एसआयटी' तर्फे चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, मराठा आरक्षणासाठीच विधानसभा व विधानपरिषदेचे तात्काळ विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्यसरकार सोबत असहकार आंदोलन करण्यात येईल, यात शेतसारा, घरपट्टी, पाणीपट्टी, वीज बील कोणीही भरणार 
नाही, या पुढील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाची राज्यस्तरीय बैठक परभणी येथे घेण्याचा ठराव या राज्यस्तरीय बैठकीत यावेळी संमत करण्यात आला आहे. 

संबंधित लेख