maratha kranti morcha jalgaon | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी जळगावमध्ये एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

जळगाव : मराठा आरक्षणासाठी आज सुरू असलेल्या आंदोलनात जळगावात एकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलीसांनी त्यांला तातडीने ताब्यात घेतले. 

जळगाव : मराठा आरक्षणासाठी आज सुरू असलेल्या आंदोलनात जळगावात एकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलीसांनी त्यांला तातडीने ताब्यात घेतले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जळगावातही जोरदार प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व दुकाने तसेच बाजारपेठा बंद आहेत. सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. या ठिकाणी सुरेश मराठे (वय 47) या गृहस्थाने मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. सकल मराठा समाजातर्फे दुपारी दोन वाजता जळगावातील गिरणा नदीच्या पूलावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख