maratha kranti morcha jalana | Sarkarnama

आठ दिवसात गुन्हे मागे घेण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सगळीकडे शांततेत आंदोलन करण्यात आले आहे. मात्र घनसावंगी येथे काही समाज कंटकांनी मोर्चात घुसुन दगडफेड केली. गुन्हे मात्र मराठा समाजाच्या तरुणांवर आणि मोर्चा आयोजकांवर दाखल केले आहेत. हे गुन्हे ता.8 ऑगस्टापर्यंत मागे घेतले नाही, तर निर्माण होणाऱ्या परिणामास लोकप्रतिनिधि आणि प्रशासन जबाबदार असेल, असे मराठा क्रांती मोर्चाच्या सोमवारी (ता.30) आयोजीत पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक ऑगस्टपासून शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा येथे बेमुदात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आठ ऑगस्टपासून मराठा आमदार आणि खासदार यांच्या निवासस्थानांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. घनसावंगी येथे झालेली दगडफेक ही मराठा समाजातील तरुणांनी केलेली नाही. पोलिस प्रशासन आणि न्यायदंडाधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर फुटेज चेक करावे, त्यात जर दगडफेक करताना कोणी अढळ्यास त्यावर कारवाई करा. मात्र विनाकारण दाखल केले गुन्हे तत्काळ मागे घ्या अशी मागणी ही आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख