Maratha Kranti Morcha Co-ordinators Meeting | Sarkarnama

मराठा क्रांती मोर्चाचे  नाव वापराल तर खबरदार!; समन्वयकांच्या बैठकीत ठराव 

अतुल पाटील 
रविवार, 16 सप्टेंबर 2018

मराठा क्रांती मोर्चातर्फे टीव्ही सेंटर, हडको परिसरात नुकतीच बैठक पार पडली. मराठा क्रांती मोर्चा हे 'बॅनर' वापरुन राज्यातील वेगवेगळ्या भागात राजकीय पक्ष सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात येत आहे. याची दखल घेत तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. समन्वयकांनी आपली मते यावेळी नोंदविली. 

औरंगाबाद : 'मराठा क्रांती मोर्चा हे नाव समाजाची आस्था आहे. सामाजिक एकता आणि अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठीच हे नाव वापरावे. वैयक्‍तिक, पक्ष, संघटना बांधणीसाठी कुणी वापर करताना आढळल्यास समन्वयक आणि समाज त्यांना रोखठोक उत्तर देतील,' असा ठराव येथील मोर्चातर्फे आयोजित समन्वयकांच्या बैठकीत करण्यात आला. 

मराठा क्रांती मोर्चातर्फे टीव्ही सेंटर, हडको परिसरात नुकतीच बैठक पार पडली. मराठा क्रांती मोर्चा हे 'बॅनर' वापरुन राज्यातील वेगवेगळ्या भागात राजकीय पक्ष सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात येत आहे. याची दखल घेत तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. समन्वयकांनी आपली मते यावेळी नोंदविली. 

'मराठा क्रांती किंवा सकल मराठा या नावाने कुणी पक्ष काढत असेल तर, होणाऱ्या परिणामांना ते स्वत: जबाबदार राहतील. मराठा क्रांती ही समाजाची आस्था बनली आहे. ज्या वेळेस सामाजिक एकता, अन्यायाविरुद्ध लढा उभारायचा असेल त्या वेळेस मराठा क्रांती मोर्चा ताकतीने ते आंदोलन उभे राहील. इतर वेळी या बॅनरचा कोणी वापर करु नये,' असा ठरावच यावेळी करण्यात आला आहे. 

बैठकीला मोर्चाचे समन्वयक प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, विजय काकडे, रमेश गायकवाड, ऍड. सुवर्णा मोहिते, सुनिल कोटकर, मनोज गायके, अंकत चव्हाण, रामेश्‍वर राजगुरेख शिवाजी जगताप, प्रदीप हारदे, प्रशांत शेळके, बाळासाहेब औताडे, संदीप सपकाळ, योगेश औताडे, विलास औताडे, रेखाताई वहाटुळे, अशोक वाघ, सतीश वेताळ आदींची उपस्थिती होती. 

संबंधित लेख