Maratha Kranti Morcha Chandrakant Patil Appologieses | Sarkarnama

#MarathaKrantiMorcha साष्टांग नमस्कार करुन विनंती करतो की हिंसाचार थांबवा : चंद्रकांत पाटील यांचा माफीनामा

साम टिव्ही
बुधवार, 25 जुलै 2018

ज्यांना विध्वंसच निर्माण करायचा आहे, अशी लोकं आंदोलनात घुसली आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यानंतर काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घेतलेली जलसमाधी, आज या आंदोलनात आणखी एकाचा झालेला मृत्यू आणि मुंबईसह राज्यात अन्य ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने केले गेलेले बंदचे आवाहन, या पार्श्वभूमीवर राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. त्यानंतर चंद्रकात पाटील यांनी जाहीर माफी मागत, हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले. 

सांगली - मी माझ्या वक्तव्याबद्दल माफी मागतो, पण बंद मागे घ्या, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाची माफी मागितली आहे. मराठा आरक्षण आंदोलनात पेड समाजकंटक घुसल्याचे वक्तव्य पाटील यांनी नुकतेच सांगलीत केले होते. त्यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

ज्यांना विध्वंसच निर्माण करायचा आहे, अशी लोकं आंदोलनात घुसली आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यानंतर काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घेतलेली जलसमाधी, आज या आंदोलनात आणखी एकाचा झालेला मृत्यू आणि मुंबईसह राज्यात अन्य ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने केले गेलेले बंदचे आवाहन, या पार्श्वभूमीवर राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. त्यानंतर चंद्रकात पाटील यांनी जाहीर माफी मागत, हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले. 

पाटील म्हणाले, "मी हात जोडतो, साष्टांग दंडवत घालतो, पण हा हिंसाचार हिंसाचार थांबवावा, अशी माझी विनंती आहे. महाराष्ट्राची परंपरा ही सर्व प्रश्नांची सामंजस्याने सोडवणूक करण्याची आहे. काल माझ्या एका वाक्याचा विपर्यास केला गेला. 58 मोर्चे निघाले, सर्व जगभर वाहवा झाली. सरकारनेही याची दखल घेतली. आता शांततापूर्ण आंदोलनाला हिंसेचे गालबोट लागू नये, एवढेच माझे म्हणणे होते. मी कुठेही मराठा समाजाला दुषणे दिली नाहीत. आरक्षण हे मी राजकीय एजेंडा म्हणून बघत नाही. ती माझी कमिटमेंट आहे. 

संबंधित लेख