Maratha Kranti Morcha Baban Gholap Shivsena | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

#MarathaKrantiMorcha शिवसेनेची भूमिका बदलली तर थेट राज्यपालांकडे राजीनामा देऊ : बबन घोलप 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 30 जुलै 2018

सकल मराठा समाजातर्फे आज शिवसेनेचे देवळाली मतदारसंघाचे आमदार योगेश घोलप आणि माजी मंत्री बबन घोलप यांच्या विहितगाव येथील निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले. मात्र आमदार घोलप मराठा आरक्षण विषयावरील पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईला गेले होते. त्यामुळे त्यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवर संपर्क करुन त्यांचे म्हणने समजुन घेतले.

नाशिक : "मी असो वा माझा मुलगा, आम्ही राखीव मतदारसंघातुन निवडून येत असलो तरी मी स्वतःला मराठा समाजाचाच आमदार समजतो. त्यामुळे केवळ पाठींबा नव्हे तर आंदोलनात सहभागी असतो. मराठा आरक्षणाविषयी शिवसेनेची वेगळी भूमिका झाली तर माझा मुलगा थेट राज्यपालांकडे जाऊन आमदारकीचा राजीनामा देईल,'' असे माजी मंत्री बबन घोलप यांनी आज सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना सामोरे जाऊन सांगितले. 

सकल मराठा समाजातर्फे आज शिवसेनेचे देवळाली मतदारसंघाचे आमदार योगेश घोलप आणि माजी मंत्री बबन घोलप यांच्या विहितगाव येथील निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले. मात्र आमदार घोलप मराठा आरक्षण विषयावरील पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईला गेले होते. त्यामुळे त्यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवर संपर्क करुन त्यांचे म्हणने समजुन घेतले. यावेळी माजी मंत्री तसेच शिवसेना नेते बबन घोलप आंदोलकांना सामोरे गेले. यावेळी ते म्हणाले, "मी सर्व आंदोलकांचे स्वागत करतो. आपण समाजासाठी आंदोलन करीत आहात. लोकप्रतिनिधींना जागे करीत आहात. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देत आहेत. मात्र, मी स्पष्टपणे सांगतो की कन्नडचे आमदार हर्षवर्धन पाटील यांनी राजीनामा दिला तेव्हाच आमदार घोलप यांचीही त्यांच्याशी चर्चा झाली होती. योगेश घोलप देखील राजीनामा देणार होते. मात्र, आज याच विषयावर शिवसेनेची बैठक आहे. त्यात काय ठरते याची प्रतिक्षा करण्यासाठी ते थांबले. आम्ही मराठा समाजाच्या अनेक आंदोलनात थेट सहभागी झालो आहोत. त्यासाठी आमच्यावर टीका आणि आरोपही झाले. मात्र ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्यांच्याशी आम्ही प्रामाणीक राहू. तो बाणा सोडणार नाही.''

आज सकाळी गणेश कदम, करण गायकर, विक्रम कोठुळे यांसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते जमले होते. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या. यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख