maratha kranti morcha and shivsena | Sarkarnama

औरंगाबादेत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाची आंदोलकास मारहाण

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणा दिल्याने मराठा क्रांतिमोर्चातील आंदोलक आणि शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांत राडा झाला. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी एका आंदोलकास मारहाण केली. ही घटना शहरातील क्रांतिचौकात सकाळी अकराच्या सुमारास घडली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांना धाव घ्यावी लागली. 

बंदची हाक दिल्यानंतर सकाळपासून शहरात आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. क्रांतिमोर्चाचे उगमस्थान असलेल्या क्रांतिचौकात आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. त्याचवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे दाखल झाले. यामुळे दानवे यांनी एका आंदोलनकर्त्यास मारहाण केली. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी दानवे यांच्यासमोरच आणखी जोरजोरात ठाकरेंच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच काही आंदोलकांनी दानवे यांच्या दिशेनी धाव घेतली. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी केली. 

संबंधित लेख