maratha kranti morcha and latur | Sarkarnama

बस...आता सरकारशी चर्चा नाही, मुंबईत चर्चा करणाऱ्यांचा राज्यस्तरीय बैठकीत निषेध

हरी तुगावकर
रविवार, 29 जुलै 2018

लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन दडपण्याचा राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. यातून रविवारी दुपारी चर्चा करण्यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर काही समन्वयकांची बैठक होत आहे. ही चर्चा आम्हाला मान्य नाही. सरकारशी चर्चेला जाणाऱ्यांचा येथे सुरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत निषेध करण्यात आला आहे. बस...आता सरकारशी चर्चा नाही. सरकारने ठोस निर्णय घेवूनच चर्चेला समोर यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. 

येथील राहिचंद्र मंगल कार्यालयात रविवारी सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्याचे समन्वयक आपले मत मांडत आहेत. त्यात रविवारी दुपारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर काही समन्वयक सरकारशी चर्चा करणार आहेत. या चर्चेच्या विषयावरही बैठकीत समन्वयकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही चर्चाच आम्हाला मान्य नाही. अशा चर्चेच्या माध्यमातून सरकार हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. चर्चला जाणाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेत वेळ घालू नये काही तरी ठोस निर्णय घेवूनच चर्चा करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान मुंबईत काही लोकांशी हाताला धरून सरकार चर्चा घडवून आणत आहे. यातून मराठा समाजाला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा आम्ही निषेध करतो. शासनाने मराठा समाजासाठी ठोस निर्णय घेवूनच सर्व समन्यवकांशी चर्चा करावी, अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केली आहे. 
 
संबंधित लेख