maratha kranti morcha and highcourt | Sarkarnama

आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाकडे 5 सप्टेंबरपर्यंत अहवाल येणार, पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मुंबई :  मराठा आरक्षण च्या अभ्यासाबाबत मागास प्रवर्ग आयोगाने तज्ज्ञांची ची समिती नेमली आहे, समिती 5 सप्टेंबर पर्यंत आयोगाला अहवाल देणार आहे, त्यांनंतर तीन महिन्यांत आयोग राज्य सरकारला अहवाल देणार, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाला दिली. तीन महिन्यांच्या अवधीवर न्यायालयाने असमाधान व्यक्त केले.
 
मराठा आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना आंदोलन करणे चूक आहे, आंदोलकांनी संयम बाळगावा आणि हिंसक पाऊल उचलू नये असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

मराठा आरक्षणप्रश्नावर शांतता पाळा, हिंसाचार करु नका, असंही मराठा मोर्चेकऱ्या ना न्यायालयाने आवाहन केले. राज्य सरकारनेदेखील विषयाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहून त्वरेने काम करावे अशी सूचना न्यायालयाने दिली. आंदोलकांनी आत्महत्या करू नये, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असेही आज न्यायालयाने सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख