maratha kranti morcha and beed | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी परशुराम सेवा संघाचा लघुरुद्राभिषेक

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

बीड : मराठा आरक्षणासह धनगर, अल्पसंख्याक समाजाच्या आरक्षणाची मागणी होत आहे. याला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून सोमवारी बीडमध्ये परशुराम सेवा संघांने येथील जटाशंकर महादेवास लघुरुद्राभिषेक केला. पावसाठीही साकडे घालण्यात आले. 

आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेल्या मराठा, धनगर व अल्प संख्याक समाजाच्या न्याय मागण्या पूर्ण व्हाव्यात, जो जे वांछील तो ते लाभो या व्यापक हेतूने परशुराम सेवा संघाच्या वतीने 51 पुरोहित तरुणांनी मंत्र घोषात संकल्प करून देवाला साकडे घातले. पहाटेच पुरातन जटा शंकराच्या शिव पिंडीस लघुरुद्राभिषेक केला. प्रशांत सुलाखे, गजानन जोशी, बाबा पाठक, संदीप जोशी, विनोद रामदासी, रमाकांत कुलकर्णी, शामसुंदर मुळे, नितेश पाठक, महेश जोशी, संदीप जोशी, नितिन भालेराव संतोष रत्नपारखी, दिपक जोतकर, मंदार कडेकर, संतोष कुर्लेकर, शेखर भोगे, आनंद रत्नपारखी, प्रमोद गोरकर, कृष्णा गोंदिकर, प्रसाद जोशी, राम रामदासी, अभिजित निर्मळ, राहुल देशपांडे, अप्पा करीकर, श्री. उमापुरकर, ओमकार लिंग्रस, रवी सुलाखे, मधुकर मोकाशी, दुर्गादास क्षीरसागर, सुरेश देशमुख यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला. 
 
संबंधित लेख