maratha kranti morcha and aurangabad | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकाने मारली गोदापात्रात उडी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 जुलै 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी कायगांव टोका येथे आंदोलन करणाऱ्यांपैकी एका तरूणाने गोदापात्रात उडी मारल्याची खळबळजनक घटना आज (ता. 23) दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली. मराठा आरक्षण जाहीर करा नाहीतर जलसमाधी घेऊ असा इशारा औरंगाबाद येथील आंदोलकांनी सकाळी दिला होता. मात्र या तरुणाला सुखरुप बाहेर काढण्यात आले. 

गंगापुर तालुक्‍यातील कायगांव टोका येथे आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीवरील पुलावर आंदोलकांनी मोर्चा काढत नदीपात्र उडी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत काकासाहेब दत्तात्रय शिंदे (रा. कानडगांव, ता. गंगापूर ) या तरूणाने गोदावरील नदीवरील नव्या पुलावरून गोदापात्रत उडी मारली. पोहता येत नसल्याने हा तरूण वाहत जुन्या पुलापर्यंत गेला. उपस्थित आंदोलक व पोलिसांनी या तरुणाला पाण्याबाहेर काढत औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात (घाटी) दाखल केले आहे. 
 
संबंधित लेख