maratha karanti morcha | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मुंबईत 9 ऑगस्टला मराठा क्रांती "महामोर्चा'

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जून 2017

रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेकदिनी झालेल्या बैठकीत शपथ घेऊन मुंबईतील महामोर्चाचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरातील मराठा समाज 
एकत्रितपणे या महामोर्चात सहभागी होणार आहे.

औरंगाबाद : मराठा आरक्षणासह विविध मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येत्या 9 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा महामोर्चा काढण्यात येणार आहे. 
शुक्रवारी (ता. 16) औरंगाबादमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत समन्वय समितीने या निर्णयाची घोषणा केली. मराठा क्रांती मोर्चा आपल्या मागण्यांवर ठाम आहे, यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, समिती मात्र यापुढे सरकारशी कुठलीही चर्चा करणार नाही असेही यावेळी समितीतर्फे 
स्पष्ट करण्यात आले. 

रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेकदिनी झालेल्या बैठकीत शपथ घेऊन मुंबईतील महामोर्चाचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरातील मराठा समाज 
एकत्रितपणे या महामोर्चात सहभागी होणार आहे. कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणाला येत्या 13 जुलै रोजी एक वर्ष पुर्ण होत आहे. या निमित्ताने राज्यातील सर्व मराठा संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक त्या क्रांती ज्योतीला श्रध्दांजली अर्पण करणार आहेत. त्याचवेळी महामोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल.

नाशिक येथे 18 जुलै रोजी राज्यव्यापी बैठक बोलावण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय राज्यभरात दौरे करून जनजागृती व तालुका, गावपातळीवर बैठका घेण्यात येणार आहेत. 

संबंधित लेख