maratha karanti maorcha maharashtra bandh | Sarkarnama

उद्याचा महाराष्ट्र बंद कडकडीत होणार पण; सार्वजनिक वाहतूक वगळणार

उमेश घोंगडे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र बंदच्या काळात राज्यात कुठेही रास्ता रोको करण्यात येणार नाही. सार्वजनिक वाहतुकीला कुठेही अडथळा करण्यात येणार, असे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. मोर्चाच्या औरंगाबाद येथे आज दुपारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले. ठाणे आणि नवी मुंबई येथे हा बंद होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात विविध भागात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्याचा बंद ठेवण्यात आला आहे. बंद राहणार की राज्यभर केवळ आंदोलन करण्यात येणार या बाबत संभ्रम होता. मराठा क्रांती मोर्चाच्या औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत आंदोलनाचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात याआधीच शाळा-महाविद्यालयांनी सुटी जाहीर केली आहे. बंदच्या काळात वाहतूक व्यवस्था सुरू राहणार की नाही. याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी सुटी जाहीर केली आहे.

चाकणसारखी घटना टाळण्यासाठी आंदोलनकांनी सावधगिरी बाळगावी कोणत्याही परिस्थितीत वाहनांची अडवणूक व तोडफोड होणार नाही, वाहतुकीला अडथळा येणार नाही, याचीा खबरदारी घेण्याचे आवाहन मोर्चाच्यात्यावतीने करण्यात आले आहे. 

दरम्यान, आंदोलनाचा भाग म्हणून उद्या पुण्यात पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सकाळी अकरा ते एक या वेळात जिल्हाधिकारी कार्यालयासोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन शांततेने करण्यात येणार असून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी हाण्याचे आवाहन मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख