, ठाणे, पालघर जिल्ह्यात आंदोलन

, ठाणे, पालघर जिल्ह्यात आंदोलन

मुंबई ः मराठा आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सकळ मराठा समाजातर्फे आज पुकाण्यात आलेल्या बंदमधून मुंबई, ठाण्याला वगळण्यात आले असले तरी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात समाजातर्फे आंदोलन करण्यात करण्यात आले.

"कोण म्हणतं देत नाय, घेतल्या शिवाय राहत नाय', एक मराठा, लाख मराठाच्या गगणभेदी घोषणा देत आज आंदोलन करण्यात आले. या चारही ठिकाणी आंदोलन शांततेत पार पडले. 

मराठा आंदोलकांनी दादर भागातील शिवाजी पार्कपासून वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत रॅली काढली. यादरम्यान शिवाजी पार्कमध्ये दुकाने बंद करण्याचा प्रयत्न आंदोलकांतर्फे करण्यात आला; मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. दादर, माटुंगा भागातील दुकाने सुरळीत सुरू होती. 

घाटकोपरमध्ये ठिय्या आंदोलन 
क्रांतिदिनी मराठ्यांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी पुकारलेल्या "महाराष्ट्र बंद'मधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई वगळले असले, तरीही आंदोलनाला कुठेही गालबोट न लागता शांततेच्या मार्गाने बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मराठा समन्वयकांनी मुंबईत ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला होता; मात्र मराठा आंदोलनाच्या 
पार्श्‍वभूमीवर सकाळपासूनच दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती. घाटकोपर पश्‍चिम आणि पूर्वेला पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त वाढवला होता. 

कळव्यातील सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मराठी आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांना आदरांजली वाहून मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला पाठिंबा दिला. मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेला बंद ठाण्यात शांतपणे सुरू असून, त्याचा एक भाग म्हणून गुरुवारी (ता. 9) कळव्यातील सुशांत सूर्यराव, संतोष शृंगारे, संतोष पालांडे, पराग मुंबारकर आदींच्या नेतृत्वाखाली कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून मराठा आरक्षण आंदोलनासाठी बलिदान दिलेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. 

वसईत मोटरसायकल रॅली 
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. 9) सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने मोटरसायकल रॅली काढण्यात आली. "एक मराठा- लाख मराठा' अशी हाक देत आरक्षणाच्या मागणीचा पुकारा करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडकोट बंदोबस्त ठेवला होता. 
वसंतनगरी येथून सुरू झालेली मोटरसायकल रॅली एव्हरशाईन, आचोळे, वसई पूर्व पूल, अंबाडी नाका, माणिकपूर, स्टेला, पापडी, तामतलाव, वसई गाव या मार्गाने तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आली. 


मुरबाडमध्ये मोर्चातर्फे फेरी 
मराठा आंदोलनाचा धसका घेऊन एसटी बस सेवा बंद केल्याने गुरुवारी मुरबाडमध्ये प्रवासी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. सकल मराठा मोर्चाच्या तरुणांनी मुरबाड शहरात फेरी काढली. आमदार किसन कथोरे यांनी शिवाजी चौकात कार्यकर्त्यांना भेटून चर्चा केली. त्यानंतर फेरी तहसील कार्यालयात आली. तेथे नायब तहसीलदार हनुमंत जगताप यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले. या वेळी बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. दुपारनंतर काही दुकाने उघडण्यात आली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com