maratha andolan in karmala | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

फडणवीसांचे पोस्टर लावलेला बोकड करमाळ्यात फिरवला! 

अण्णा काळे 
बुधवार, 25 जुलै 2018

करमाळा (सोलापूर) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोकडाच्या अंगावर व गळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे फोटो लावून जागरण गोंधळ मोर्चा काढण्यात आला. पोथरी नाका ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. 

करमाळा (सोलापूर) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोकडाच्या अंगावर व गळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे फोटो लावून जागरण गोंधळ मोर्चा काढण्यात आला. पोथरी नाका ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. 

पंढरपूर वारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी येण्याचे टाळल्यानंतर केलेल्या वक्तव्याचा निषेध यावेळी करण्यात आला. 

सकाळी साडेनऊ वाजता शहरातील पोथरे नाका येथून शेकडो आंदोलनकर्त्यांनी पोतराज, हलगी, बोकड, तुतारी व पिपाणी अशा सर्व जागरण गोंधळ घालण्याच्या निमित्ताने एकत्र झाले होते. हा मोर्चा जय महाराष्ट्र चौक, छत्रपती चौक, आंबेडकर पुतळा ते तहसील कार्यालय पर्यंत नेण्यात आला .यावेळी आंदोलकांच्यावतीने गोदावरी नदी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यासाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल करावा म्हणून 302 सह्यांचे निवेदन तहसीलदार संजय पवार यांच्याकडे देण्यात आले. 

करमाळा तहसील कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी ता. 21 जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरु असून या चार दिवसात दोन वेळा करमाळा शहर व तालुका बंद ठेवण्यात आला होते. आज तालुक्‍यातील कोर्टी,वाशिंबे भागात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. 

संबंधित लेख