maratha agitation at shekhar charegaonkar residence | Sarkarnama

#MarathaReservation चरेगावकर यांच्या निवासस्थानासमोर घोषणाबाजी 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानासमोर घोषणा दिल्या. यावेळी श्री. चरेगावकर यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली. 

कऱ्हाड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानासमोर घोषणा दिल्या. यावेळी श्री. चरेगावकर यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली. 

येथील वाकाण परिसरातील चरेगावकर यांच्या निवासस्थानासमोर सकाळी नऊच्या सुमारास मराठा बांधव एकत्र जमले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी श्री. चरेगावकर यांनी निवासस्थानाबाहेर येवून मराठा बांधवांना घरामध्ये येण्याची विनंती केली. त्यानुसार श्री. चरेगावकर यांनी आरक्षणाची मागणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा, अशी शासनाला विनंती करावी अस सूचीत केले. 

चर्चेने प्रश्‍न सुटू शकतो असे सांगून श्री. चरेगावकर म्हणाले, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी योग्य आहे, मात्र ती देताना कायद्याच्या पातळीवर ती टिकेल यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी शासन पातळीवर गती आली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख