maratha activist thaks to sp sharma in sangli | Sarkarnama

#MaharashtraBandh मराठा आंदोलक खुश झाले, त्यांनी SP सुहेल शर्मांचा सत्कार केला! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सांगली : मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर आज पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या टीमने नेटका बंदोबस्त तैनात केला. पोलिसांनी संयमाने बंद हाताळला. अपवाद वगळता कोठेही गैरप्रकार घडला नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने अधीक्षक सुहेल शर्मा यांचा स्टेशन चौकात सत्कार करण्यात आला. 

आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यव्यापी बंद पुकारल्यामुळे पोलिसांनी कालच बंदोबस्ताचे नियोजन केले होते. जिल्ह्यातील 25 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एक हजारहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात केला होता. त्याचबरोबर होमगार्डची मदत घेण्यात आली.

आज सकाळपासून प्रमुख रस्त्यावर आणि चौकाचौकात पोलिस हजर होते. मराठा क्रांती मोर्चाने बंद शांततेत पाळण्याचे आवाहन केल्यामुळे सकाळपासून सर्वत्र शांतता होती. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बंदबाबतची माहिती अधीक्षक शर्मा व अप्पर अधीक्षक बोराटे घेत होते. तसेच पोलिसांनाही बंदबाबत सूचना दिल्या जात होत्या. पोलिसांनी आवश्‍यक ठिकाणी नेटका बंदोबस्त तैनात करून संयमाची भूमिका घेतली. त्यामुळे अपवाद वगळता सर्वत्र बंद शांततेत पाळला गेला. पोलिसांनी कोठेही गैरप्रकार घडू दिला नाही. 

पोलिसांच्या आजच्या भूमिकेचे मराठा क्रांती मोर्चाने स्वागतच केले. पोलिसांच्या संयोजनाबद्दल अधीक्षक शर्मा यांचा स्टेशन चौकात सत्कार करण्यात आला. 

संबंधित लेख