maratha activist take care of haj pilgrims | Sarkarnama

#Maratha9August रस्ते आडवले गेलेतरी आंदोलक हज यात्रेकरुंची काळजी घेणार 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

सांगली : मराठा क्रांतीच्यावतीने क्रांतिदिनी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र हज यात्रेसाठी जिल्ह्यातून अनेक लोक जाणार आहेत. ठिकठिकाणी रास्ता रोको केला जाणार आहे, ज्या गाड्यांवर हज यात्रा असा फलक लावलेला असेल, त्या यात्रेकरुंना अडवू नका, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे. 

मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून उद्या (ता. 9 ऑगस्ट) क्रांतिदिनी सांगली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. गावोगावी निषेध फेऱ्या बंद पाळले जातील. मध्यरात्री 12 पासून 24 तास बंद करण्यात येणार आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीत आज सलग दुसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरुच आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर चक्काजाम केले जाईल. एस. टी. अथवा शासकीय मालमत्तांचे नुकसान करू नये, असे आवाहन मराठा क्रांतीतर्फे आज पुन्हा करण्यात आले. दरम्यान, आरक्षणाला विलंब होत असल्याबद्दल मराठा क्रांतीतर्फे आज दुपारी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

जुन्या स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे दुसऱ्या दिवशी धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलकांकडून सरकारचा निषेध करण्यात येत आहे. मराठा समन्वयक डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर व महेश खराडे यांनी गुरुवारी होणाऱ्या आंदोलनाबाबतची भूमिका मांडली. 

ते म्हणाले,"मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर 2018 पर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. मुळात यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न झाल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख