Marath Kranti Morcha Mumbai News | Sarkarnama

मराठा क्रांती मोर्चा आयोजकांची उद्या दादरला बैठक

संदीप खांडगेपाटील
शुक्रवार, 23 जून 2017

कोपर्डीतील अत्याचार पिडीत भगिनीला श्रध्दाजंली वाहण्याकरिता 13 जुलै रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे 'कँडल मार्च' काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती मुक मोर्चा, महाराष्ट्रच्या वतीने 9 ऑगस्टला क्रांतीदिनानिमित्त काढण्यात येणार्‍या मुंबईतील मोर्चाच्या नियोजनाकरिता दादर येथे होणार्‍या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

मुंबई : शेतकरी संप, शेतकरी कर्जमाफी, सरकारी कर्मचार्‍यांचा सातवा वेतन आयोग या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारसमोरील अडचणीत दिवसेंगणिक वाढच होत चालली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाकडून 9 ऑगस्ट रोजी मुंबईत काढण्यात येणार्‍या मोर्चाचे नवे 'टेन्शन' राज्य सरकारपुढे उभे ठाकले आहे. या मोर्चाच्या आयोजनासाठी 24 जुन रोजी दादर येथे आयोजकांनी बैठक आयोजित केली आहे.

कोपर्डीतील अत्याचार पिडीत भगिनीला श्रध्दाजंली वाहण्याकरिता 13 जुलै रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे 'कँडल मार्च' काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती मुक मोर्चा, महाराष्ट्रच्या वतीने 9 ऑगस्टला क्रांतीदिनानिमित्त काढण्यात येणार्‍या मुंबईतील मोर्चाच्या नियोजनाकरिता दादर येथे होणार्‍या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. शनिवारी, सांयकाळी 5 वाजता दादर (प.), प्लाझा सिनेमासमोरील शिवाजी मंदिर हॉलमधील छत्रपती शाहु सभागृहात ही बैठक होणार आहे.

संबंधित लेख