marataha to get reservation in teachers recrutment | Sarkarnama

मराठा समाजाला पहिले आरक्षण २४ हजारांच्या शिक्षक भरतीत

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

मुंबई : मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होण्यापूर्वी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला असला तरी शिक्षक भरतीत 16 टक्के मराठा समाजाला राखीव जागा ठेवण्यात याव्या, अशी मागणी भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. त्यांची ही मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज (शुक्रवार) मान्य केली आहे.

विधानसभेत शिक्षकभर्तीचा विषय तारांकित प्रश्नात उपस्थित झाला होता. या चर्चेत सहभागी होताना मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी शिक्षकभरतीचा निर्णय यापूर्वी झाला असला तरी मराठा समजला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय काल (गुरुवार) झाला. हा कायदा लागू करूनच ही शिक्षकभरती करण्यात यावी आणि त्यामध्ये मराठा समाजाच्या 16 टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणी आमदार शेलार यांनी केली. 

त्यावर उत्तर देताना तावडे म्हणाले, ''येत्या काळात होणाऱ्या 24 हजार ऑनलाइन शिक्षक भरतीमध्ये 16 टक्के मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेल आणि ही शिक्षकभरती वेळेत पूर्ण होईल. याबाबत सरकार काळजी घेईल''. 

संबंधित लेख