marahta kranti morcha appeal to maratha youth | Sarkarnama

मराठा युवकांनी संयम बाळगावा, मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयातील सुनावणीनंतर याचिकाकर्ते वकिल गुणरत्न सदावर्ते यांना झालेल्या मारहाणीचे समर्थन करता येणार नाही. त्यासाठी मराठा युवकांनी संयम बाळगायला हवा. लोकशाही मार्गानेच मराठा आरक्षणाचा लढा सुरू ठेवायचा आहे. असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केले आहे. 

आज उच्च न्यायलयाच्या आवारात माध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जालना येथील बेरोजगार युवक वैजिनाथ पाटील यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. वैजिनाथ पाटील याने केलेल्या या कृत्याचे समर्थन करता येणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चानं स्पष्ट केले आहे. पाटील हा चार महिन्यापासून पुण्यात नोकरीच्या शोधात आहे. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले असून, मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर नोकरीच्या आशा पल्लवीत झाल्याची त्याची भावना आहे. 

मात्र, मराठा आरक्षणाला न्यायालयात वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल करत आव्हान दिले आहे. याचा राग मनात धरून पाटील याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देखील आरक्षण टीकावे यासाठी न्यायालयात पाच याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे, आरक्षणाचा न्यायालयीन संघर्ष देखील लोकशाही व कायदेशिर मार्गानेच सुरू आहे. अशा वेळी मराठा तरूणांनी भावनेच्या भरात कायदा हातात घेवू नये. कोणत्याही बेकायदा कृत्याचे विपरीत पडसाद पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट केले आहे. 
 
संबंधित लेख