Many Leaders Entering in Shivsena in Pandharpur Claims Sanjay Raut | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

पंढरपुरात अनेकांचा होणार शिवसेनेत प्रवेश : संजय राऊत यांचा दावा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 डिसेंबर 2018

"शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोमवारच्या पंढरपूर दौऱ्याचे वेळी अनेक जणांचा शिवसेना पक्ष प्रवेश देखील होणार आहे, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी येथे केला. 

पंढरपूर : "शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोमवारच्या पंढरपूर दौऱ्याचे वेळी अनेक जणांचा शिवसेना पक्ष प्रवेश देखील होणार आहे, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी येथे केला. 

मात्र, राऊत यांनी त्यांची नावे आणि अधिक तपशील देण्याचे टाळले. त्यादिवशी तुम्हाला समजेलच, त्याचा स्फोट आत्ता करत नाही असे उत्तर त्यांनी दिले. ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्याचे वेळी त्यांना भेटण्यासाठी विविध क्षेत्रातील सुमारे 125 ते 150 लोक इच्छुक आहेत. या सगळ्यांच्या भेटी कशा करुन द्यायच्या याचे नियोजन करत आहोत, असे राऊत म्हणाले.
शिवसेनेचा उपयोग केवळ राजकीय फायद्यासाठी केला जातो आणि नंतर संबंधित लोक शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात याकडे राऊत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, अशा लोकांना त्यांची पायरी यावेळी दाखवून दिली जाईल. यापूर्वी कोणी काय केले हा आमच्या दृष्टीने महत्वाचा विषय नाही. आता नवा इतिहास घडेल असे त्यांनी नमूद केले.

भाजपा- शिवसेना युती होणार असे भाजपाचे नेते सांगत आहेत. त्या विषयी बोलताना भारतीय जनता पक्ष हा आंतरराष्ट्रीय पक्ष आहे असा उपरोधिक टोला मारुन राऊत म्हणाले, अशा पक्षातील सर्व पातळ्यांवरील नेते मुद्दाम या प्रकारची विधाने करुन त्यांचा पक्ष चर्चेत ठेवत असतात. त्यांची फारशी दखल घेण्याची गरज नाही. यावेळी खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे , जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत, आमदार नारायण पाटील, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, युवा सेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल राजूरकर, विनोद कदम आदी उपस्थित होते.

संबंधित लेख