कर्मचाऱयांकडूनच मंत्रालयाचे विद्रूपीकरण

कर्मचाऱयांकडूनच मंत्रालयाचे विद्रूपीकरण

मुंबई : आज 2 ऑक्टोबर! महात्मा गांधी यांचा जन्मदिवस. आज संपूर्ण देशात स्वच्छता दिन साजरा केला जात आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात स्वच्छतेचा गंधही नसल्याचे दिसून येते.

मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या सचिवालय जिमखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीला उभे राहणाऱ्या हौशी कर्माचाऱ्यांनी सर्वत्र प्रचारासाठी पोस्टरबाजी केली. मंत्रालयात ज्या ठिकाणी मोकळी जागा मिळेल तेथे पोस्टर चिटकविण्यात त्यांनी धन्यता मानली.


प्रचाराचे हुकुमी ठिकाण म्हणजे उद्वहनाची (लिफ्टची) जागा. कर्मचारी लिफ्टसाठी उभे राहणार म्हणजे हमखास पोस्टर बघणार, याचा आडाखा बांधत सर्व लिफ्टच्या ठिकाणच्या भिंति रंगून गेल्या आहेत. मंत्रलयाची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाते. कर्मचाऱ्यांची ही सवय विभागाला माहित असल्याने या विभागाने काही वर्षांपासून पोस्टर न चिटकविण्याचे परिपत्रक काढले. मात्र सरकारच्या आदेशाला न जुमानता कर्माचार्यांनी मंत्रालयाचे विद्रुपीकरण करुन टाकले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com