manpj shende and shivendraraje bhosale | Sarkarnama

खड्डे बुजविणे हा आमदारांचा राजकीय स्टंट : मनोज शेंडे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

सातारा : साताऱ्यातील रस्त्यावरील खड्डे खासगी मुरूम टाकून मुजविण्याचा चाललेला प्रयत्न म्हणजे एक राजकिय स्टंट आहे. त्यांची ही कृती सातारकर नागरीकांप्रती दाखविलेले बेगडी प्रेम आहे, असे प्रतिउत्तर सातारा पालिकेचे बांधकाम सभापती मनोज शेंडे यांनी दिले आहे. 

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा शहरातील भुविकास बॅंक ते जुना आरटीओ चौक रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने आज बुजविले. तसेच त्यांनी खासदार उदयनराजेंवरही घणाघाती टिका केली होती. या टिकेला सातारा पालिकेचे बांधकाम सभापती श्री. शेंडे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, खासदार उदयनराजेंची वाढती लोकप्रियता आमदारांना खुपत आहे. म्हणून असे खड्डे बुजविण्याचे स्टंट ते करत आहेत. 

पालिकेने शहरातील सर्व रस्त्यांवर मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचे काम गेल्या दीड महिन्यापासून सुरू ठेवले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यांचे पॅचिंग केले जात आहे. नगरपरिषदेने पॅचिंगच्या संदर्भात कोणतीही दिरंगाई केलेली नाही. पालिकेने केलेले प्रयत्न दिसूनही ज्यांना जाणवत नसतील, अशा आमदार व त्यांच्या बगलबच्च्यांनी त्यांची नकारात्मक मानसिकता बदलावी, असा टोलाही श्री. शेंडे यांनी लगावला आहे. 15 ऑक्‍टोबरपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करता येत नाही. त्यानंतर लगेचच शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण हाती घेतले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 
 
संबंधित लेख