manora contruction corruption | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

मनोराच्या कामासाठी बनावट बिले, साडेतीन कोटी हडपले 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

मुंबई : मनोरा आमदार निवासातील आमदारांची व्यवस्था घाटकोपर येथे करण्याच्या तयारीत असतानाच मनोरा आमदार निवासातील खोल्यांचे कामे न करताच त्याची खोटी बिले तयार करून तब्बल तीन कोटी 70 लाख 51 हजार रूपये हडपल्याचा प्रकार समोर आला आहे.

यात सत्ताधारीसह विरोधीपक्ष आमदारांच्या खोल्यांच्या कामाचा समावेश असून यात अनेक प्रकारची कामे केल्याचे कंत्रादाराने दाखवून त्यासाठीच रक्‍कम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून लाटली असल्याची धक्‍कादायक माहिती सत्ताधारी पक्षाचे आमदार चरण वाघमारे यांनी समोर आणली आहे. 

यासंदर्भात माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीच्या आधारावर आमदार वाघमारे यांनी या आर्थिक गैरव्यवहाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. 

मनोरा आमदार निवास येत्या महिन्याभरानंतर रिकामे करून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू केले जाणार आहे, त्याच दरम्यान येथे असलेल्या खोल्यांचे काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निविदा काढून व त्यासाठी कंत्राटदारांकडून बनावट करारनामे आणि वर्कऑर्डर करून त्याची मोजमाप पुस्तिकांमध्ये नोदी केल्या आहेत. नोंदीच्या आधारचे तीन कोटी 70 लाख 51 हजार रूपयांच्या शासकीय निधी हडपला असून त्याची चौकशी करण्याचे आश्‍वासन आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती आमदार वाघमारे यांनी आज मंत्रालयात दिली. 

आमदार वाघमारे यांचे मनोरा आमदार निवासातील बी विंगमध्ये असलेल्या कक्ष क्रमांक 95 ची मागील वर्षी काही किरकोळ दुरूस्ती करण्यात आली होती, मात्र त्यासाठी लाखाच्या वर खर्च आला नसल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते राजू वाघमारे यांनी माहिती अधिकारात मिळवली होती.त्याच आधारावर इतर खोल्यांची माहिती मागवली असता 22 जून 2017 रोजी 10 आमदारांच्या खोल्यांचे काम न करताच त्याचे खोटी बिले तयार करण्यात आल्याची बाब समोर आली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आणि बांधकाम मंत्र्यांकडेही तक्रार नोंदविण्यात त्यानंतर झालेल्या चौकशीनंतर चौकशी अहवाल तयार झाला मात्र कारवाई झाली नसल्याचे दोषी अधिकाऱ्यांना विभाग पाठी घालत असल्याचा आरोप केला होता, मात्र आता या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्‍वासन दिले असल्याची माहिती आमदार वाघमारे यांनी दिली.  

संबंधित लेख