manora building mla | Sarkarnama

 मुदत उलटूनही "मनोरा'त मुक्काम 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

मुंबई : नरिमन पॉईंट येथील जीर्ण झालेले मनोरा आमदार निवास सोडण्यास आमदार अद्याप तयार नाहीत. टेकूवर उभ्या असलेल्या या इमारतीतील तब्बल 239 खोल्या अद्याप रिकाम्या व्हायच्या आहेत. उच्चाधिकार समितीने ही इमारत रिकामी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला 31 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. 

या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, आमदार खोल्या सोडत नसल्याने "मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी उच्चाधिकारी समिती'ची 21 ऑगस्ट रोजी बैठक झाली. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हेही उपस्थित होते. 

त्यावेळी 31 ऑगस्टपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने ही इमारत रिकामी करून घ्यावी, असा निर्णय झाला होता. इमारत रिकामी न झाल्यास थेट वीज-पाणीजोडणी कापण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात ही घरे रिकामी झालेली नाहीत. 

ही इमारत पाडण्यासंदर्भात अजूनही तारीख ठरलेली नाही. यावर उच्चाधिकार समिती निर्णय घेणार आहे. येथील सुविधा इतरत्र हलविण्यास सांगितले आहे. वैद्यकीय सेवा आकाशवाणी आमदार निवासात स्थलांतरित होईल, असे विधिमंडळ सचिवालयाचे अवर सचिव रवींद्र जगदाळे यांनी सांगितले. 

"पर्यायी व्यवस्था करा' 
आमदार निवासात कार्यकर्तेच नाही तर मतदारसंघातील गरीब लोकही राहातात. त्यात अनेक रुग्ण असतात. त्यांना मुंबईत हॉटेलमध्ये राहाणे शक्‍य नाही. अशांनी काय करावे? त्यामुळे आमदार निवासातील खोली मी सोडलेली नाही. आमची पर्यायी सोय करा; मगच खोल्या रिकाम्या करतो, असे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. 
 
संबंधित लेख